"शासन भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करतात. परंतु त्यांच्या न्याय हक्क मागण्या या पूर्ण करत नाहीत"....
पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांच्या वतीने सर्व कर्मचारी तांत्रिक व सुधारित वेतनश्रेणी आणि अन्य मागण्यासाठी दिनांक 15 मे 2025 पासून पुकारलेल्या बेमुदत संपात ते कर्मचारी सामील झालेले आहे. त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी त्यांनी या बेमुदत संपाचा अवलंब केलेला आहे. महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करतात परंतु त्यांच्या न्याय हक्क मागण्यांच्या कडे दुर्लक्ष करून त्या मागण्या त्या पूर्ण करत नाहीत. शासनाचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये कामाची पावती म्हणून कर्मचारी यांनी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भूमी अभिलेख विभागात द्वितीय क्रमांक देऊन गौरव केलेला आहे. परंतु सुधारित वेतनश्रेणी या प्रमुख मागणीबाबत कोणती टिप्पणी करण्यात त्यांनी आलेली नाही. भूमी अभिलेख खात्यातील कर्मचारी यांना सद्यस्थितीला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात येते. महाराष्ट्र राज्य शासनाचे इतर विभागातील भूमापक यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी पाहता शासनाचा दुजाभाव दिसून येतो .त्या...