पोस्ट्स

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....     सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को. ऑफ असोसिएशन सोलापूर च्या वतीने पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.   दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँक या बँकेने आजपर्यंत सर्वसामान्य सभासद व ग्राहकांना तत्पर सेवा व बँकिंग क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व ग्राहकांमध्ये नावलौकिकास पात्र ठरलेल्या या बँकेला आदर्श बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला.    ठेवी 201 ते 500 कोटी पर्यंत विभाग यामध्ये  दि. पंढरपूर को-ऑपरेटिव मर्चंट बँक या बँकेला तृतीय क्रमांक मिळाला असून या दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक हा पुरस्कार दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात आला.     याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख तसेच दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले माजी चेअरमन सोमनाथ डोंबे संचालक विजयकुमार परदेशी ...

"राज ठाकरे यांच्या शुभहस्ते हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी चे शुभारंभ".. अनेक मान्यवरांची उपस्थिती.

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी....    पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणापासून काही अंतरावर वारकरी,भाविक भक्त,पर्यटकाच्या सोईच्या उद्देशाने व सेवेसाठी पंचताराकीत च्या धर्तीवर हे होटल ग्रँड रेसिडेन्सी व हॉटेल श्रेयस या दोन्हीच्या माध्यमातून पर्यटकांना व वारकरी भावी भक्तांना राहण्याची व जेवण्याची उत्तम प्रकारची सोय दिलीप बापू धोत्रे यांनी करून दिल्यामुळे पर्यटकांची सोय झालेली आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी च्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.     या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर म्हणून असंख्य राजकीय नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील पंढरपूर नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले सरकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची चेअरमन कल्याणराव काळे., नगरसेवक नाना कदम, आणि असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

"राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते हॉटेल ग्रँड चे आज शुभारंभ"

इमेज
 पंढयपूर प्रतिनिधी....      आज शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर पासून लगत असलेल्या पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर काही  मिनिटाच्या अंतरावर सर्व सोयीने उपयुक्त असे पंचतारांकित होटला लाजवेल अशा प्रकारचे हॉटेल ग्रँड चे उभारणी करून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भाविक भक्तांची तसेच पर्यटकांची राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय असलेले हॉटेल ग्रँड हे सुरू केलेले असून या ठिकाणी असंख्य सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते हॉटेल ग्रँड चा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमास राज्यातील विविध पक्षांचे मान्यवर नेतेमंडळी तसेच आमदार खासदार व असंख्य कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

"पंढरी सायक्लोथान2025.सायकल प्रेमी साठी आयोजित"........सागर कदम.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....     चंद्रभागा नदी संवर्धनासाठी राबवीत असलेला उपक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील फेब्रुवारीच्या महिन्यांमधील 16 फेब्रुवारी 2025 रविवार या दिवशी ठीक सकाळी सहा वाजता पंढरपुरातील लहान,थोर सर्व वयोगटातील सायकल प्रेमींना या पंढरी सायकल 2025 या उपक्रमामध्ये सामील होण्याचे आवाहन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी केलेले आहे.       पंढरपूर शहरातील सायकल प्रेमी च्या साठी पंढरी सायकल 2025 या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश  हा मोफत ठेवलेला आहे.प्रत्येक सायकल प्रेमींनी आपले नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सादर कदम यांनी आज रोजी केले.       या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना अडीच किलोमीटर तसेच सात किलोमीटर अशा अंतराची सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला टी-शर्ट त्याचप्रमाणे गुल्कोजचेपाणी, खाऊ वाटप आणि प्रशस्तीपत्र देण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती साग...

"होटल ग्रँड चे ग्रँड शुभारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते होणार"....मनसे नेते दिलिप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी...     पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या करकंब या गावाजवळ मुख्य रस्त्या लगत   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलिप बापू धोत्रे यानी होटल ग्रँड नामक पंच तारांकिताप्रमाणे होटल ची उभारणी केली असून या होटल ग्रँड चा शुभारंभ दिनाक 7 फेब्रुवारी 2025 या रोजी मनसे   चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार असून या हॉटेल ग्रँड च्या शुभारंभ प्रसंगी अनेक राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.    हॉटेल ग्रँड या हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित नेतेमंडळी बाळासाहेब नांदगावकर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला असंख्य राजकीय नेते त्याचप्रमाणे सामाजिक नेते मंडळी उपस्थित राहणार आहे अशी म...

"पंढरपूर मर्चट बँक कुर्डूवाडी शाखा येथे एटीएमची सुविधा उपलब्ध ".... व्यवस्थापक अतुल म्हमाणे.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....      सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून ओळखले जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेच्या कुर्डूवाडी येथील शाखेमध्ये आज रोजी दिनांक 30 जानेवारी 2025 या दिवशी शुभ मुहूर्तावर पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी दिली.       पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेच्या अन्य शाखेप्रमाणे कुर्डूवाडी येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या येथे एटीएम ची सुविधा आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तत्पर सेवा देणारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आता कुर्डूवाडी येथे एटीएमची सुविधा देऊन ग्राहक व खातेदारांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.     या एटीएम मशीनची पूजा चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने,रमेश कुलकर्णी साहेब,EDP मॅनेजर मोहनराव मोहिते कुर्डवाड...

"परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? " प्रशांत परिचारक.

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी.....    परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? असा सवाल प्रशात परिचारक यानी आज माढा,मोहोळ तालुक्यातील नुकतेच झालेले आमदार अभिजित पाटील,व राजू खरे याना उद्देशून विचारला.गेले चाळीस वर्षे आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कित्येक  नेत्यानी प्रयत्न केला.परंतू आम्ही अजूनही राजकारणात सक्रिय आहोत.कित्येक आमदार आले गेले आम्ही येथेच आहोत.अशी बोचरी टिका प्रशात परिचारक यानी केली.     पंढरपूर नगर पालिका वर गेली कित्येक वर्षे परिचारक गटाचे वर्चस्व आहे.या वर्चस्वाला येत्या नगरपालिकेच्या निवडणूकी ला विरोध दर्शवण्यासाठी व नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी आतुर झालेले नेते मंडळी परिचारक याना टार्गेट करण्यास सुरुवात झाली आहे.पाहूया कोण बाजी मारणार ते..