"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"
पंढरपूर प्रतिनिधी..... सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को. ऑफ असोसिएशन सोलापूर च्या वतीने पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँक या बँकेने आजपर्यंत सर्वसामान्य सभासद व ग्राहकांना तत्पर सेवा व बँकिंग क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व ग्राहकांमध्ये नावलौकिकास पात्र ठरलेल्या या बँकेला आदर्श बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठेवी 201 ते 500 कोटी पर्यंत विभाग यामध्ये दि. पंढरपूर को-ऑपरेटिव मर्चंट बँक या बँकेला तृतीय क्रमांक मिळाला असून या दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेला आदर्श बँक हा पुरस्कार दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख तसेच दि. पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले माजी चेअरमन सोमनाथ डोंबे संचालक विजयकुमार परदेशी ...