"आता लोकांनी ठरवले आहे.माझे पार्सल दिल्ली दरबारी पाठवायचे आहे ".... राम सातपुते


 पंढरपूर ( प्रतिनिधी) आता लोकांनीच ठरवलेले असल्यामुळे माझे पार्सल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता आता  दिल्लीत पाठवणार आहेत.
    भाजपाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांच्यावर काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी टीका केली होती. त्याठिकाणी हे बीडचे पार्सल बीडला पाठवणार असे म्हणाले होते. परंतु मी येथे आवर्जून सांगू इच्छितो, की माझे पार्सल सोलापूर मतदार संघातील जनता ही आता दिल्लीला पाठवणार आहे. या पार्सल मध्ये सोलापूर मतदार संघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी, उजनी धरणातील पाणीसाठा वाढवण्याच्या उद्देशाने उजनी धरणातील गाळ काढला जाणार , सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवला जाणार त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीला सक्षम करणार अशा अनेक कामांसाठी हे माझे पार्सल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता दिल्ली येथे पाठवणार आहे. 
     धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी प्रतिउत्तर आज रोजी दिले. सोलापूर लोकसभा मतदारसंघ मधील गाव भेटीच्या दौऱ्यामध्ये मला प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या या लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार म्हणून मी आणि माढा लोकसभा मतदारसंघातील रणजीत सिंह नाईक निंबाळकर आम्ही दोघे भाजपचे उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून येणार असे त्यांनी यावेळी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....