पोस्ट्स

"पंढरपूर मर्चट बँक कुर्डूवाडी शाखा येथे एटीएमची सुविधा उपलब्ध ".... व्यवस्थापक अतुल म्हमाणे.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....      सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून ओळखले जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेच्या कुर्डूवाडी येथील शाखेमध्ये आज रोजी दिनांक 30 जानेवारी 2025 या दिवशी शुभ मुहूर्तावर पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी दिली.       पंढरपूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेच्या अन्य शाखेप्रमाणे कुर्डूवाडी येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या येथे एटीएम ची सुविधा आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तत्पर सेवा देणारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आता कुर्डूवाडी येथे एटीएमची सुविधा देऊन ग्राहक व खातेदारांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.     या एटीएम मशीनची पूजा चेअरमन शितल तंबोली यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने,रमेश कुलकर्णी साहेब,EDP मॅनेजर मोहनराव मोहिते कुर्डवाड...

"परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? " प्रशांत परिचारक.

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी.....    परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? असा सवाल प्रशात परिचारक यानी आज माढा,मोहोळ तालुक्यातील नुकतेच झालेले आमदार अभिजित पाटील,व राजू खरे याना उद्देशून विचारला.गेले चाळीस वर्षे आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कित्येक  नेत्यानी प्रयत्न केला.परंतू आम्ही अजूनही राजकारणात सक्रिय आहोत.कित्येक आमदार आले गेले आम्ही येथेच आहोत.अशी बोचरी टिका प्रशात परिचारक यानी केली.     पंढरपूर नगर पालिका वर गेली कित्येक वर्षे परिचारक गटाचे वर्चस्व आहे.या वर्चस्वाला येत्या नगरपालिकेच्या निवडणूकी ला विरोध दर्शवण्यासाठी व नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी आतुर झालेले नेते मंडळी परिचारक याना टार्गेट करण्यास सुरुवात झाली आहे.पाहूया कोण बाजी मारणार ते..

"शिवशंभो नगर फलकाचे अनावरण मा.उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले याच्या हस्ते"

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..पंढरपूर शहरा लगत असलेले एम.एस.ई.बी.जवळ असलेल्या उपनगरा मध्ये शिवशंभो नगर म्हणून ओळखले जाणारे नगर या नगराचे नामकरण फलकाचे अनावरण पंढरपूर शहरातील लोकप्रिय उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले याच्या शुभ हस्ते करण्यात आले.    यावेळी उपस्थित संतोष कवडे, सुमीत शिदे,तात्या जगताप,देवमारे मेबर,माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, सतीश काळे,रमेश काळे,रोहीत काळे,व या परिसरातील रहिवासी उपस्थित होते.     या उद्घाटन प्रसंगी नागेश काका भोसले आपल्या मनोगता मध्ये ते म्हणाले पंढरपूर शहरातील उपनगरामधून मुलभूत नागरी सुविधा युद्ध पातळीवर उपल्बद्ध करुन दिल्या जात आहे.या एम.एस.ई.बी मागील देवकते नगरा लगत असले्या या शिवशंभो नगरामध्ये देखील ड्रेनेज लाईन,पिण्याचे पाणीची पाईप लाईन हे टाकून झाले आहे.ते लवकरच सुरु होणार आहे.या भागातील दिवबत्तीची अडचण आहे.ती सोडवली जाईल.व याभागामध्ये रस्त्यावरील दिवे सुरु केले जातील असे आश्वासन त्यानी यावेळी त्यानी आपल्या मनोगता मधून व्यकत केले.

"माझ्या वडीलाना लवकर न्याय का मिळत नाही?" वैभवी देशमुख चा पोलीस प्रशासनाला सवाल.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी....      माझ्या वडिलांची हत्या होऊन कित्येक दिवस उलटून गेले परंतु अजूनही माझ्या वडिलांना न्याय मिळालेला नाही पोलीस प्रशासन न्याय  का मिळवून देत नाही.?असा सवाल आज पंढरपूर येथील जन आक्रोश मोर्चा पंढरपूर येथे काढण्यात आला होता त्यावेळी आपल्या भाषणांमधून बोलत असताना कुमारी वैभवी देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या हत्यानंतर आपल्या कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था व पोलीस धिम्या गतीने करीत असलेला तपास  पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय का देऊ शकत नाही. माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या सर्व गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.     माझ्या कुटुंबाच्या सोबत संपूर्ण समाज तसेच सर्व सामाजिक संघटना व विविध जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यानी शेवटपर्यंत साथ द्यावी अशी अपेक्षा वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली.     या जन आक्रोश मोर्चाला हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते

"राक्षसी वृत्ती विरुद्ध माणुसकीचा हा जन आक्रोश लढा आहे "आमदार अभिजित आबा पाटील.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...    बीड जिल्ह्यातील मस्साजोगी येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही मानवतेला लाजवणारी घटना असून या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात माणुसकीचा हा जन आक्रोश लढा आहे असे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज पंढरपूर येथे आयोजित जन आक्रोश आंदोलनाच्या सभे स्थानी ते बोलत असताना म्हणाले.    या जन आक्रोश मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधील धनगर समाजाचे तसेच दलित नेते व ओबीसी नेते हे या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झाले होते. या जनअक्रोश सभेच्या ठिकाणी वसंत नाना देशमुख,डॉ. प्रणिती ताई भालके, संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख, धनंजय देशमुख, किरण भोसले, सुधीर भोसले, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,माजी नगरसेवक आदित्य फतेपुरकर, महेश पवार, आरपीआय नेते सचिन खरात, दीपक  वाडदेकर, किरण घाडगे संतोष कवडे तसेच विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.    यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील पुढे बोलत असता म्हणाले विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी ज्यावेळी हात्येचे विस्त...

छ.शिवाजी महाराज चौक येथे खूनी हल्ला वहातुक पोलिस नदाफ,आणि खटकाळे याच्या साहसाचे कौतुक.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..    पंढरपूर शहरातील छ.शिवाजी चौक परिसरामध्ये आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला करुन सुभाष निमकर नावाच्या इसमाला जख्मी करण्यात आले.जुन्या भाडंणाच्या कारणावरुन दाळे गल्ली येथील रहिवासी  अमित वाठारकर यानी हा हल्ला करुन सुभाष निमकर याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली.सदर घटना घडत असताना छ.शिवाजी महाराज चौक येथे कार्यरत असलेले वहातुक पोलीस नदाफ आणि खटकळे यानी धावत जाऊन हल्लेखाराला त्वरीत जेरबंध केले.वाहतुक पोलीसानी तत्परता दाखवल्याने जखमीचे प्राण वाचले.    हल्लेखोर अमित वाठारकर हल्ला करीत असताना वाहतुक पोलिस हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना जमलेल्या लोकाना आरोपीस पकडण्यासाठी मदतीस या म्हणत असताना जमलेल्या लोकानी फक्त बघ्याची भुमिका घेतली.कोणीही पुढे सरसावला नाही.अशा घटना प्रसंगी सर्वसामान्य लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात हे सिद्ध झाले.    वहातुक पोलीसानी त्वरीत जखमी निमकर याला पुढील उपचारासाठी रवाना केले.    पंढरपूर शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होते की काय अशी शंका जनतेच्या मना...

नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची उत्सवाची यात्रा सुरू

इमेज
 नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत सूर्यनारायण देव यात्रा उत्सव सुरू  पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत असलेल्या सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साह सुरू झाली असून ही यात्रा 31 डिसेंबर पासून सुरू असून ही यात्रा पुढे संपूर्ण महिनाभर 28 जानेवारीपर्यंत महिनाभर सुरू असते .परंतु यात्रेचा कालावधी हा रथ सप्तमी पर्यंत असल्याचे पुजारी गणेश अवताडे यांनी सांगितले . पंढरपूर - सोलापूर -रोडवर अवघ्या दहा किलोमीटर वर असणाऱ्या नारायण चिंचोली येथे पुरातन हेमाडपंथी    सूर्यनारायणाचे मंदिर असून हे मंदिर अति प्राचीन असून हे मंदिर अत्यंत दुर्मिळ व कोरीव बांधकाम असलेले महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे . नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक पौष महिन्यामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात .आलेल्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती नारायण चिंचोली चे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे...